प्रकाशने
वैभवशाली पुणे शहर : वर्णनात्मक ग्रंथसूची
पुणेकर आणि पुण्याविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असणारे जिज्ञासू वाचक तसेच पुण्यावर नव्याने लिहू इच्छिणारे लेखक आणि आंतरविद्याशाखीय संशोधक यांच्यासाठी संदर्भमूल्य असणारा ग्रंथ. पुण्यावर वाचन, लेखन आणि संशोधन करणाऱ्या अभ्यासकांना पुण्यावरील जवळ जवळ ५०० ग्रंथांची सविस्तर माहिती पुस्तकात दिलेली आहे. स्त्री लेखिकांनी पुण्यावर लिहिलेल्या ग्रंथांची स्वतंत्र सूची, विविध संस्थांच्या स्मरणिका, पुण्यातील वृतपत्रे इत्यादी माहितींनीयुक्त अशी सहा महत्त्वपूर्ण परिशिष्ट्ये पुस्तकात आहेत. अशा प्रकारचे पुण्यावरील हे पहिलेच पुस्तक आहे. पुणे शहराचा सर्वांगीण इतिहास लिहिण्यासाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणून प्रत्येक ग्रंथालयात असावा असा संग्राह्य ग्रंथ. प्रत्येक पुणेकराच्या संग्रही असावा असा संदर्भ ग्रंथ.
प्रकाशन वर्ष:- २०२३प्रकाशक:- ग्रंथसंहिता प्रकाशन
लेखक:- रवींद्र श्रीराम ठिपसे (मो. ९५२७२३४४११ )
पृष्ठे :- १४+२५६
किंमत :- रु. ३२०/-
महाराष्ट्र टाइम्स : २५ नोव्हेंबर २०२३
