चित्रावली १ - शाईच्या दौती
चिनीमातीची काळ्या रंगाची आयताकृती दौत. २१x११.५ x४.५ से. मी. आकारमान, लाल, काळी आणि जांभळी शाई ठेवण्यासाठी तीन स्वतंत्र चिनीमातीची भांडी, त्या भांड्यांवर शाईच्या रंगांची इंग्रजीत नावे, पुढ्यात टाक ठेवण्यासाठी खोबण, दौतीच्या वरच्या कडेवर व टाकाच्या खोबणीवर करवतीच्या दातर्या प्रमाणे नक्षी.
२०वे शतक
पितळेची वर्तुळाकार दौत. ८.५ से. मी. व्यास, ५ से. मी. ऊंची, नक्षीदार काठ, लिखाण करावयाच्या डेस्क जवळ टांगून ठेवण्यासाठी काठावर ४ छिद्रांची योजना.
१९वे शतक, महाराष्ट्र
यांत्रिक पद्धतीने लाकडी ठोकळ्यावर कोरलेली वर्तुळाकृती दौत. ८ से. मी. व्यास, ५ से.मी. ऊंची, शाईची भांडी ठेवण्यासाठी कोरलेल्या खोबणी, खोबणीत चपखल बसणारी प्लॅस्टिकची तीन शाईपात्रे.
१९४०चे दशक, महाराष्ट्र
अपारदर्शी निळ्या रंगाच्या काचेची आयताकृती जोड दौत. १४.५x८x६.५ से. मी. आकारमान, दौतीच्या तळाशी पाटाप्रमाणे अंगचे दोन पाय, दोन्ही दौतीस पितळेची कड असून त्यावर बिजागरीने बसवलेले झाकण, दोन्ही दौतींच्या मधोमध दोन पितळेच्या टाक ठेवणी.
१९१०
