चित्रावली २ - शाईच्या दौती
गुलाबी रंगाच्या अपारदर्शी काचेच्या बैठकीवर पितळेच्या चौकोनी क्लिप मध्ये पारदर्शी काचेची दौत. ११.५x१० से. मी. आकारमान, टाक ठेवणीसह ऊंची १० से. मी., दौतीस पितळेची कड व त्याला बिजागरीच्या साह्याने जोडलेले पितळी झाकण, झाकणावर प्लॅस्टिकचा शंकू.
२०वे शतक
अॅल्युमिनिअमची वर्तुळाकृती दौत. ८ से. मी. व्यास, ५ से. मी. ऊंची, शाई ठेवण्यासाठी प्लॅस्टिकचे काढता घालता येणारे शाईपात्र, डब्याच्या झाकणाप्रमाणे बीजागरी बसवलेले खोलगट गोल झाकण, लेखणी ठेवण्यासाठी पाच छिद्र.
२० वे शतक
प्लॅस्टिकची आकाशी निळ्या रंगाची दौत. ८x६x३ से. मी. आकारमान, शाई ठेवण्यासाठी काढता घालता येण्यासारखी प्लॅस्टिकची दोन उभट शाईपात्रे, बिजागरी बसवलेले पेटीप्रमाणे झाकण, टाक ठेवण्यासाठी पुढयात खोबण.
२०वे शतक, जपान
उघडलेल्या पुस्तकावर व्हायोलिनच्या प्रतिकृतीची दौत. १४x८.५ से. मी. आकारमान, दौतीच्या आसपासच्या पुस्तकाच्या पृष्ठावर संगीताचे सांकेतिक स्वरांकन, उजव्या कोपर्यात गुलाबाचे फूल, व्हायोलिनचा पृष्ठभाग म्हणजेच झाकण, आतील बाजूस शाई ठेवण्यासाठी दोन काचपात्रे
२०वे शतक, जपान
