चित्रावली 3 - शाईच्या दौती

काचेची आयताकृती दौत. १५.५ x७.५x६ से. मी. आकारमान, दोन दौतींच्या मधोमध वाळू ठेवण्यासाठी जागा, झाकण हरवलेले.
१९व्या शतकाची अखेर


१७.५ x ९.५ से. मी. आकारमानाच्या लाकडी फळीवर १२.५x३.५ से. मी. आकरमानाच्या लाकडी ठोकळ्यात शाईपात्र ठेवण्याच्या दोन खोबणी, खोबणीत काढता घालता येणारी प्लॅस्टिकची दोन शाईपात्रे, ठोकळ्यावर पेटी सारखे बिजागरीने बसवलेले वाढीव आकाराचे झाकण.
२०व्या शतकाचा उत्तरार्ध


दोर्‍याच्या लाकडी रिळाच्या आकाराची चिनीमातीची दौत. ४.५ से. मी. व्यास, ५ से. मी. ऊंची.
१९व्या शतकाची अखेर


अष्टकोनी आयताकृती चौथर्‍यावर दोन्ही टोकास दोन अष्टकोनी दौती. दोन्ही दौतींच्या मध्ये आयफेल टॉवरची प्रतिकृती, चौथर्‍याच्या पुढ्यात नक्षीदार वाढीव टाक ठेवण्याची खोबण, दौतीस चित्र असलेली बिजागरीची झाकणे.
२०व्या शतकाचा पूर्वार्ध