चित्रावली ५ - टाक/पेन स्टँड

टाक/पेन ठेवण्याचा पितळेचा स्टँड. मागच्या बाजूस झुकलेल्या कमानीसारखा आकार, ऊंची १० से. मी., टाक ठेवण्याच्या पाच खोबणी


अर्धवर्तुळाकृती कमानदार ओतीव लोखंडाचा स्टँड. अर्ध परिघावर टाक ठेवण्याच्या पाच खोबणी, आतील तसेच बाहेरील बाजूंवर भौमितिक कोरीव नक्षी, ऊंची ६ से. मी.
१९व्या शतकाचे अखेरचे दशक .


अॅल्युमिनिअमचा टाक/पेन ठेवण्याचा स्टँड. मागील बाजूस झुकलेल्या कमानीसारखा आकार, ऊंची ११ से. मी., पुढच्या बाजूस टाक ठेवण्याच्या चार खोबणी आणि मागील बाजूस एक खोबण, स्टँडच्या दोन्ही बाजूंवर कोरीव नक्षीकाम.
२०व्या शतकाचा पूर्वार्ध


फाऊंटन पेनच्या आकाराचा चिंनीमातीचा पेन बॉक्स.
२०वे शतक